2 मजूर लिफ्टमध्ये पाच तास अडकले

0
5

येथील जुन्ता हाउस या सरकारी इमारतीच्या लिफ्टमध्ये सुमारे पाच तास अडून पडलेल्या दोन व्यक्तींची येथील अग्निशामक दलाच्या जवानांनी काल सुटका केली. ही घटना सकाळी 11 च्या सुमारास घडली, अशी माहिती मिळाली. ईद आणि आषाढी एकादशीची सुट्टी असल्याने जुन्ता हाउस इमारतीमध्ये कुणीच नव्हते. सदर इमारतीमध्ये विश्रांती घेण्यासाठी गेले होते. इमारतीच्या लिफ्टमधून खाली येताना अचानक लिफ्ट बंद पडली. लिफ्टमध्ये अडकून पडलेल्या व्यक्तीकडे मोबाईल फोन होता; परंतु रिचार्ज न केल्याने दुसऱ्याशी संपर्क साधू शकत नव्हते. अग्निशामक दलाच्या जवांनाना दुपारी या घटनेचे माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन सुमारे अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर दोघांची सुटका करण्यात आली. जुन्ता हाउस या सरकारी इमारतीच्या लिफ्टमध्ये अडकून पडलेल्या दोन व्यक्तींनी आपण मजूर असल्याची माहिती अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांना दिली.