राज्यसभेच्या सभागृह नेतेपदी भाजपकडून जे. पी. नड्डा

0
9

भाजपने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपवताना त्यांची राज्यसभेच्या सभागृह नेतेपदी निवड करण्यात आली आहे. तत्पूर्वी पीयूष गोयल हे भाजपचे राज्यसभेतील सभागृह नेते होते. मात्र आता ते लोकसभेवर निवडून गेल्याने हे पद रिक्त झाले होते. मूळ हिमाचल प्रदेशमधील असलेले जे. पी. नड्डा हे गुजरातमधून राज्यसभेवर निवडून गेले आहेत. सध्या भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासोबतच केंद्रीय आरोग्य मंत्रिपदाचा कार्यभार ते सांभाळत आहेत.