170 ऑनलाइन सेवांचा शुभारंभ

0
8

राज्य सरकारच्या 27 खात्यांशी संबंधित आणखीन 170 ऑनलाइन सेवांचा शुभारंभ मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते येथे काल करण्यात आला. गोवा राज्याची पूर्ण डिजिटायलेशनच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. राज्यभरातील नागरी सेवा केंद्राच्या माध्यमातून शहराबरोबरच ग्रामीण भागात सुध्दा सरकारी सेवा उपलब्ध केल्या जात आहेत. त्यामुळे नागरिकांना विविध सेवांसाठी सरकारी कार्यालयात हेलपाटे घालण्याची गरज नाही. सेवा केंद्रातून सुरुवातीला मोफत सेवा दिल्या जात होत्या. आता, सेवा केंद्रातून सेवांसाठी माफक शुल्क आकारणी केली जात आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले. ग्रामीण मित्रांच्या माध्यमातून सरकारी सेवा घरपोच देण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. आगामी दोन महिन्यांत ही योजना सुरू होईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.