143 गृहरक्षक पदांसाठी आले तब्बल 8 हजार अर्ज

0
6

राज्य सरकारने जाहीर केलेल्या 143 गृहरक्षक पदांसाठी राज्यभरातून 8 हजार एवढे अर्ज आले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात आलेल्या या अर्जदारांच्या अर्जाची, तसेच त्यांच्या प्रमाणपत्रांची छाननी करण्याचे काम सध्या जोरात चालू असल्याची माहिती काल सूत्रांनी दिली. सध्या राज्यात 1200 एवढे सरकारी गृहरक्षक आहेत. सध्या राज्यात जे सरकारी गृहरक्षक आहेत, त्यांच्यासाठी सरकारने एका अधिसूचनेद्वारे पोलीस शिपाई, अबकारी रक्षक, तुरुंग रक्षक, फायरमॅन व वनरक्षक ही 10 टक्के पदे आरक्षित केलेली आहेत. जाहीर करण्यात आलेली 143 गृहरक्षक पद भरण्यात आल्यानंतर सध्या सेवेत असलेल्या 1200 गृहरक्षकांपैकी जे ज्येष्ठ आहेत, त्यांना वरील पदांवर बढती मिळेल.