14 विरोधी पक्षांची सर्वोच्च न्यायालयात धाव

0
9

देशातील विरोधी पक्षातील नेत्यांवर केंद्रीय तपास संस्थांकडून होत असलेल्या कारवायांविरोधात विरोधी पक्षांनी सामूहिकपणे सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. विरोधी पक्षांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर 5 एप्रिल रोजी सुनावणी होईल. देशातील 14 विरोधी पक्षांनी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले की, विरोधात असलेल्या राजकीय पक्षांविरोधात केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय) आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) या तपास संस्थांचा गैरवापर केला जात आहे. याचिका दाखल करणाऱ्यांमध्ये काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, आम आदमी पार्टी, झारखंड मुक्ती मोर्चा, जनता दल युनायटेड, भारत राष्ट्र समिती, राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पक्ष, शिवसेना (उद्धव ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, सीपीआय, सीपीएम, डीएमके आणि नॅशनल कॉन्फरन्स यांचा समावेश आहे.