11 उपअधीक्षकांच्या बदल्यांचा आदेश जारी

0
8

पोलीस खात्यातील 11 पोलीस उपअधीक्षकांच्या बदलीचा आदेश काल जारी करण्यात आला. तसेच 4 उपअधीक्षकांकडे अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. पोलीस उपअधीक्षक गुरुदास कदम यांची वास्को, सुदेश नार्वेकर यांची वाहतूक विभाग उत्तर गोवा, शेख सलीम यांची किनारी सुरक्षा, सिद्धांत शिरोडकर यांची मडगाव सागर एकोस्कर यांची केपे, नीलेश राणे यांची कोकण रेल्वे, जिवबा दळवी यांची डिचोली, आशिष शिरोडकर यांची पेडणे, राजेंद्र प्रभुदेसाई यांची वाहतूक विभाग दक्षिण गोवा, शिवराम वायंगणकर यांची फोंडा आणि अमित बोरकर यांची जीआरपी 2 मध्ये बदली करण्यात आली आहे. तसेच, उपअधीक्षक रूपेंद्र शेटगावकर यांच्याकडे एसबी-दक्षिण, नरेश मंगडकर यांच्याकडे एटीएस, सुरज हळणकर यांच्याकडे सायबर गुन्हा आणि विल्सन डिसोझा यांच्याकडे उपअधीक्षक मुख्यालय पणजीचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.