राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बुधवारी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात 106 जणांना पद्म पुरस्कार प्रदान केले. त्यामध्ये 6 मान्यवरांना पद्मविभूषण, 9 मान्यवरांना पद्मभूषण, तर 91 मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आले.
यावेळी ‘ओआरएस’चे निर्माते दिलीप महालनाबिस, प्रसिद्ध आर्किटेक्ट बालकृष्ण दोशी आणि सपाचे नेते मुलायम सिंह यादव यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच तबलावादक झाकिर हुसेन, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा आणि विज्ञान क्षेत्रातील योगदानाबद्दल श्रीनिवास वर्धन यांना पद्मविभूषण प्रदान करण्यात आला.
सुमन कल्याणपूर, एस. एल. भैरप्पा, कुमार मंगलम बिर्ला, दीपक धर, वाणी जयराम, स्वामी चिन्ना जियार, कपिल कपूर, सुधा मूर्ती आणि कमलेश पटेल यांना पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, लोकसभा अध्यक्ष ओम बिरला, केंद्रीय मंत्री भूपेंद्र सिंह यादव यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित होते.