100 गुंडांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई

0
3

राज्यातील वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी गृह खात्याच्या आदेशानुसार पोलिसांनी एक विशेष मोहीम हाती घेऊन राज्यातील सुमारे 100 गुन्हेगारी पार्श्वभूमीवर असलेल्या गुंडांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली. राज्यातील 14 पोलीस स्थानकातील क्षेत्रात ही कारवाई करण्यात आली.
राज्यातील शांतता भंग करणे, वाद निर्माण करुन राज्यातील सलोखा बिघडविणे, हिंसक कारवाई करणे अशा विघातक कारवाया करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कडक भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व पोलीस महासंचालक आलोक कुमार यांच्या आदेशानुसार ही कारवाई सुरू करण्यात आली आहे.

राजधानी पणजीत 17 जणांविरुद्ध, कळंगुटमध्ये 20, जुने गोवेत 6, साळगावात 2, पेडण्यात 10, मोपात 3, मांद्रेत 6, डिचोलीत 16, आगशीत 2, म्हापशात 17, हणजूणमध्ये 4, कोलवाळमध्ये 11 व पर्वरी येथे 8 जणांवर कारवाई करण्यात आली. उत्तर गोव्यातील चौदा पोलीस स्थानकांत भारतीय न्याय संहितेच्या कलम 126 अंतर्गत सर्वाधिक 68 जणांवर कारवाई करण्यात आली. कलम 35 अंतर्गत 19 जणांवर, तर कलम 160 अंतर्गत 22 जणांवर, कलम 128 अंतर्गत 13 जणांवर कारवाई केली गेली. दरम्यान, रात्रीच्या गस्तीत वाढ करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी ड्युटीवर असलेल्या किनारी भागांतील पोलिसांपैकी 40 टक्के पोलीस हे रात्रीच्या गस्तीवर असतील, तर अन्य ठिकाणी 30 टक्के पोलीस रात्रीच्या गस्तीवर असतील.