ॲप्रेंटिसशिपसाठी युवक-युवतींना नोंदणीचे आवाहन

0
5

82 सरकारी आस्थापने व सुमारे 416 खासगी कंपन्यांतून नोकऱ्यांच्या शोधात असलेल्या 10 हजार युवक-युवतींना ॲप्रेंटिसशिप योजनेखाली प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती काल कौशल्य विकास व ॲप्रेंटिसशिप खात्यातर्फे देण्यात आली. ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, त्यांना www.apprenticeshipindia.gov.in या राष्ट्रीय पोर्टलवर नोंदणी करावी लागणार आहे. त्यानंतर त्यांना त्यांच्या आवडीच्या ॲप्रेंटिसशिपसाठी अर्ज करता येईल. या 10 हजार जणांपैकी 5 हजार जणांना सरकारी आस्थापनांत, तर 5 हजार जणांना खासगी कंपन्यांत प्रशिक्षण देण्यासाठी 15 जुलै रोजी निवडपत्रे देण्यात येतील. हे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना अनुभव प्रमाणपत्रे प्रदान दिले जाईल. नोकऱ्यांसाठी अर्ज करताना त्यांना हे अनुभव प्रमाणपत्र सादर करावे लागेल.