ॲक्सिस बँकेत खातेउघडण्याची सक्ती नाही

0
14

‘मुख्यमंत्री गुरुदक्षिणा’ योजनेंतर्गत अनुदानित शिक्षण संस्थांना ॲक्सिस बँकेत खाते उघडण्याची सक्ती नाही, असे परिपत्रक शिक्षण खात्याने काल जारी केले. शिक्षण खात्याने ‘मुख्यमंत्री गुरुदक्षिणा’ योजनेंतर्गत राज्यातील अनुदानित शिक्षण संस्थांना ॲक्सिस बँकेत खाते उघडण्याची सक्ती करणारे एक परिपत्रक जारी केले होते. या परिपत्रकामुळे शिक्षण संस्थांमध्ये खळबळ उडाली होती. शिक्षण खात्याच्या या परिपत्रकाला काही शिक्षण संस्थांकडून विरोध करण्यात आला. आमदार ॲड. कार्लुस फेरेरा यांनी परिपत्रक मागे न घेतल्यास न्यायालयात धाव घेण्याचा इशारा दिला होता. राज्यातील अनुदानित शिक्षण संस्थांना ॲक्सिस बँकेत खाते सुरू करण्याचा पर्याय खुला आहे; पण सक्ती नाही, असे शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. दरम्यान, आमदार ॲड. कार्लुस फेरेरा यांनी शिक्षण खात्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.