९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप

0
18

नाशिकमध्ये ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपात ९५ वे साहित्य संमेलन मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यात घेण्याचे ठरवण्यात आले. तर पाच वर्षानंतर पुन्हा एकदा नाशिकमध्ये साहित्य संमेलन होणार आहे, असे अखिल भारती मराठी साहित्य महामंडळाचे विद्यमान अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी नाशिकध्ये सांगितले. काल या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप कार्यक्रमात श्री. पाटील बोलत होते.

दरम्यान, यंदाही संमेलनावरुन भरपूर राजकारण झाले. त्यातच कोरोनाचे संकट, प्रकृतीच्या कारणामुळे संमेलनाध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांची संमेलनाला अनुपस्थिती, निमंत्रण पत्रिकेत नाव न टाकल्याच्या कारणावरून भाजपच्या नेत्यांची संमेलनाकडे पाठ आणि काल समारोपाच्या दिवशीच सकाळी कोरोनाचे सापडलेले दोन रूग्ण, त्याचप्रमाणे दुपारी ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून झालेली शाईफेक अशा अनेक वादासह काल सायंकाळी या संमेलनाची सांगता झाली.