प्राचीन नालंदा विद्यापीठाची परंपरा पुढे चालू ठेवण्यासाठी उभारण्यात आलेल्या नालंदा आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे वर्ग कालपासून राजगीर येथे सुरू झाले. यंदा पहिल्या शैक्षणिक वर्षात जगभरातील १५ निवडक विद्यार्थी, इतिहास विज्ञान, पर्यावरण आणि परिसंस्था या शाखांतून शिक्षण घेणार आहेत. आणकी १ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले असल्याचे कुलगुरू गोपा सब्रवाल यांनी सांगितले. नालंदा विद्यापीठ भारतात इ. स. ४१३ ते ११९३ दरम्यान, अस्त्त्विात होते. विद्यापीठाचे औपचारिक उद्घाटन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या उपस्थित या महिन्यात होईल.