भारत जोडो यात्रेबाबत विचारमंथन करण्यासाठी कॉंग्रेसने पक्षाच्या मुख्यालयात वरिष्ठ नेत्यांची काल बैठक घेतली. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा होणार असून, कन्याकुमारी ते काश्मीर असा तिचा प्रवास असेल. ही यात्रा ७ सप्टेंबरपासून कन्याकुमारीतून सुरू होईल आणि तिचा समोराप १४८ दिवसांनंतर काश्मीरमध्ये होईल. कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मे महिन्यात पक्षाच्या चिंतन शिबिरात या बैठकाची घोषणा केली होती. या यात्रेद्वारे कॉंग्रेस २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी शंखनाद करेल. पाच महिन्यांत कॉंग्रेसची भारत जोडो यात्रा ३ हजार ५०० किमी आणि १२ हून अधिक राज्यांचा प्रवास करेल.