७० लाखांच्या रकमेसह दोघांना अटक

0
104

>> पर्वरीत स्कूटरमधील २ हजारांच्या नव्या नोटांची बंडले जप्त

 

पर्वरी पोलिसांच्या हाती २००० रुपयांच्या नव्या नोटांची बंडले असलेले सत्तर लाखांचे घबाड लागले असून एवढी मोठी रक्कम कोणाची आहे याचा पोलीस शोध घेत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे पर्वरीत लाखो रुपयांची रक्कम येणार असल्याचे त्यांना समजले. निरीक्षक परेश नाईक यांनी बुधवारी (दि. ७) आपल्या टीमसह पर्वरीतील येथील वडा कोंबडा हॉटेलसमोरील रस्त्यावर दोघा संशयितांना ज्युपिटर स्कुटरवरून जाताना अडवून झडती घेतली असता स्कुटरच्या डिकीत २०००/- च्या नवीन नोटांची बंडले आढळून आली. पोलिसांनी सुमारे सत्तर लाख रुपये स्कुटरसह जप्त केले असून दोघांना ताब्यात घेतले आहे. संशयित आरोपींची नावे रमेश नार्वेकर (मेरशी) आणि सिद्धू कपडनवार (पणजी) अशी आहेत. सदर रक्कम कोणाची आहे याची पोलीस कसून चौकशी करीत आहेत.
उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक कार्तिक कश्यप, उपअधीक्षक नेल्सन अल्बुकर्क यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक परेश नाईक, उप निरीक्षक विश्वजित चोडणकर, पोलीस शिपाई अजय कोरगावकर, प्रशांत चोपडेकर, ङ्गांसीस ङ्गर्नांडिस, नितेश नाईक, भिकाजी परब आणि अनिकेत गावडे यांनी या मोहिमेत भाग घेतला होता.