६ लाखांचा गुटखा जप्त

0
82

>> ट्रक चालकांना अटक

मोले चेकनाक्यावर रविवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास दोन ट्रकांमधून नेला जाणारा ६ लाख रुपये किंमतीचा गुटखा कुळे पोलीसांनी जप्त केला. याप्रकरणी ट्रक चालक संजय राम कुप्रे (२८, गुंजी- खानापूर) व पांडुरंग आंबेवाडकर (३३, लोंढा खानापूर) याना अटक केली आहे.

पोलीसानी दिलेल्या माहितीनुसार कर्नाटकहून जीए ०१ झेड १०७८ व एमएच १२ एचडी ५७५२ क्रमांकाच्या ट्रकांची मोले चेकनाक्यावर तपासणी केली असता त्यात बेकायदेशीरपणे गुटखा वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले. पोलीसानी दोन्ही ट्रकांची झडती घेतली असता त्यात ६ लाख रुपये किंमतीचा गुटखा आढळून आला. कुळे पोलीसानी दोन्ही ट्रक व गुटखा जप्त केला असून चालकांना अटक केली आहे. निरिक्षक निलेश धायगोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अर्जुन सांगोडकर यानी पंचनामा केला. पोलीस हवालदार गुणा धगेकर, संतोष शिरसोडकर, प्रेमानंद सावंत व गृहरक्षक समीर देसाई यानी सहकार्य केले.