केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने गोव्यातील सहा जैव-संवेदनशील विभाग अधिसूचित केले आहे. त्यात भगवान महावीर वन्यजीव अभयारण्य आणि राष्ट्रीय पार्क, म्हादई वन्यजीव अभयारण्य, नेत्रावळी वन्यजीव अभयारण्य, खोतीगाव वन्यजीव अभयारण्य, बोंडला वन्यजीव अभयारण्य आणि डॉ. सलिम अली पक्षी अभयारण्याचा समावेश आहे. या जैव संवेदनशील विभागात हाती घेतल्या जाऊ शकणार्या उपक्रमाबाबत माहिती अधिसूचनेत नमूद करण्यात आली आहे. या अधिसूचनेच्या कार्यवाहीवर देखरेख ठेवण्यासाठी एका समितीची निवड करण्यात आली आहे. या जैव संवेदनशील विभागाचा विभागीय मास्टर प्लॅन तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.