६९४ विद्यार्थ्यांना सुमीतून बाहेर काढले

0
11

रशियाच्या हल्ल्यामुळे युक्रेनच्या सुमी शहरात ६९४ भारतीय विद्यार्थी अडकले होते. या विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे. केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी या संदर्भात माहिती दिली. सुमी शहरात अडकलेल्या सर्व भारतीयांना बसमधून आणण्यात येत आहे. या बसेस पोल्टावासाठी रवाना झाल्या आहेत, असे पुरी यांनी सांगितले. दरम्यान, युक्रेनच्या मायकोलिव्ह बंदरात ७५ भारतीय खलाशी अडकले आहेत, त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न भारतीय दुतावासाने सुरू केले आहेत.