बीग फूट लोटलीच्या करीश्मा व ऍड्रीयल आल्वारीस यांनी कापडावर तब्बल ६२०० पावलांचे ठसे गोळा करून नवा बिग ङ्गूट लिम्का विक्रम प्रस्थापित केला आहे.
४० ु १५ मिटर कापडावर हे ठसे गोळा करण्यात आले होते. ठसे गोळा करण्याचे काम दि. २६ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर २०१० या काळात झाले होते. नंतर ‘ऍन्सेस्ट्रल गोवा’च्या वर्धापनदिनी त्यांनी सर्व पावलांचे ठसे एकत्र जुळवून एक महाकाय पाऊलाची प्रतिमा बनविली होती. या प्रतिमेची पार्श्वभूमी म्हणून ४० मिटर लांब कॅन्व्हास वापरण्यात आला व त्यावर ७० कलाकारांनी ‘कलेद्वारे धार्मिक व जातीय सलोखा’ या मध्यवर्ती संकल्पनेवर रंगकाम केले.
समाजातील विविध जाती, धर्माच्या तसेच सर्व थरांतील लोकांत शांतता, ऐक्य, मैत्री व सलोखा नांदवा हा या कलाकृती बनविण्यामागील हेतू असल्याचे करिश्मा हिने सांगितले.
करिश्मा व ऍड्रीयल यांनी आपले वडील महेंद्र आणि आई मावरिन आल्वारिस यांच्या पावलांचे ठसे घेऊन उपक्रमास सुरुवात केली होती व शेवटचा ठसा शिक्षिका रजनी गुप्ते यांचा घेतला होता. त्यानंर जमविण्यात आलेल्या ठशांत मुख्यमंत्री दिगंबर कामत, वीज मंत्री आलेक्स सिक्वेरा, वनमंत्री ङ्गिलिप नेरी रॉड्रिग्स, अनिवासी भारतीयांचे आयुक्त एदुआर्द ङ्गालेरो, पत्रकार अनिल पै आदींच्या पावलांचे ठसे आहेत. कलाकार, सुतार, गवंडी, पत्रकार, टूर ऑपरेटर्स, टॅक्सी ड्रायव्हर्स, पर्यटक यांचेही ठसे घेण्यात आले होते.
१९९७ साली महेंद्र आल्वारिस यांनी संत मीराबाई यांचे १४ ु ५ आकारात शिल्प अवघ्या १५ दिवसांत बनवून लिम्का बुकमध्ये विक्रम नोंदवला होता.