>> दाबोळी विमानतळाच्या फनल झोनलमध्ये येणारे एक घर पाडले
दाबोळी विमानतळाजवळील फनल झोनमध्ये येणार्या ४५ घरांपैकी एक घर काल उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पाडण्यात आले, तर परिसरातील इतर ४४ बांधकामांवरील कारवाईस सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम स्थगिती मिळाली आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करत संबंधित प्रशासकीय यंत्रणेने बुधवारी दाबोळी विमानतळापासून थोड्याच अंतरावर असलेल्या एका घरावर कारवाई करून ते जमीनदोस्त केले. उच्च न्यायालयाने येथील ४५ घरांवर कारवाईचे आदेश दिले होते. मात्र त्यापैकी ४४ जणांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने पुढील आदेश येईपर्यंत कारवाईस अंतरिम स्थगिती दिली. त्यामुळे या घरांवरील कारवाई तूर्त टळली आहे.
यापैकी एक घरमालक सर्वोच्च न्यायालयात गेला नव्हता. नौदल, पीडीए विभाग आणि पंचायतीने त्याचे घर पाडण्याचा कट रचल्याचा आरोप सदर घरमालकाने केला.