पुढील पर्यटन मोसमातही पुनरावृत्तीचा धोका
राज्यात पर्यटन मोसम बहरण्याच्या काळातच विदेशी पर्यटकांची संख्या रोडावत असल्याची चर्चा चालू असतानाच तब्बल ४० हजार रशियन पर्यटकांनी आपली गोव्यातील आरक्षण ेरद्द केल्याचे वृत्त आहे. अलीकडील काळात गोव्यात येणार्या विदेशी पर्यटकांमध्ये सर्वाधिक संख्या रशियन पर्यटकांचीच असते. राज्यातील रशियन वकिलातीचे कायदा सल्लागार विक्रम वर्मा यांनी रशियन पर्यटकांनी आपले नियोजित गोवा दौरे रद्द केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ‘माझ्या माहितीप्रमाणे या मोसमात किमान ४० हजार रशियन पर्यटकांनी आपली गोवा भेटीची आरक्षणे रद्द केली आहेत आणि पुढील पर्यटन मोसमातही त्याची पुनरावृत्ती पहायला मिळण्याची शक्यता आहे.’ असे वर्मा म्हणाले.
आता रशियन पर्यटकांनी आपला मोर्चा पोर्तुगाल, स्पेन या देशांमध्ये वळविल्याचेही पर्यटन उद्योग क्षेत्रातील सूत्रांनी सांगितले.