४०० वनरक्षक भरती प्रक्रियेची लवकरच पूर्तता

0
162

पुढील एक-दोन महिन्यांत वन खात्यात सुमारे ४०० वन रक्षकांची भरती करण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचे वन खात्यातील सूत्रांनी सांगितले.या भरतीसाठीची लेखी परीक्षा यापूर्वीच झालेली असून शारीरिक क्षमता चाचणी, चालण्याची चाचणी व तोंडी परीक्षा लवकरच घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. म्हादई अभयारण्य, मोले अभयारण्य, खोतीगाव अभयारण्य, सली’ अली पक्षी अभयारण्य आदी अभयारण्यांसह मोठे वनक्षेत्र असून त्यावर लक्ष ठेवण्यासाठी वनरक्षकांची उणीव भासत असल्याने सरकारने आणखी ४०० वनरक्षकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यासाठीची प्रक्रिया यापूर्वीच सुरू झालेली आहे. भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर सरकारने वनरक्षकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला होता. ही भरती करताना प्रामुख्याने वन परिसरातील युवकांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. वन परिसरातील युवकांना वनक्षेत्रात राहण्याचा अनुभव असल्याने ड्युटी करणे त्यांना सुलभ होईल व वनक्षेत्रात काम करताना त्यांना भीती वाटणार नाही यासाठी त्यांना प्राधान्य देण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याची ’ाहिती सूत्रांनी दिली.
बोंडलातील सुरक्षेचा फेरआढावा
हल्लीच दिल्ली येथील प्राणी संग्रहालयात एक युवक वाघाच्या भक्ष्यस्थानी पडल्याच्या पार्श्‍वभूमीवर बोंडला प्राणीसंग्रहालयातील सुरक्षेचा फेरआढावा घेतला जात आहे.
बोंडला प्राणी संग्रहालयात प्रत्येकी एक वाघ व वाघीण असल्याचे सांगण्यात आले. त्यांना आंध्रप्रदेश येथील प्राणी संग्रहालयातून आणण्यात आले होते. या वाघांना जेथे ठेवण्यात आले आहे तेथे सुरक्षेसंबंधीचे सगळे उपाय करण्यात आलेले असून चुकूनही कुणी वाघांना ठेवलेल्या जागी जाऊ शकू नयेत यासाठी आवश्यक ते कठडे उभारण्यात आले आहेत. बोंडला येथे पाच बिबटेही आहेत पण त्यांना पिंजर्‍यात ठेवण्यात आले असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.