३२ लाखांचे दागिने हस्तगत; अन्चो रट्याच्या मुसक्याही आवळल्या

0
12

येथील एका नामांकित सराफी शोरुममधून ३२ लाख ५८ हजार ९०८ रुपयांचे सोन्याचे दागिने चोरी केल्या प्रकरणी दुकानातील एका कर्मचारी विकास कुशवाह (३१ वर्षे) याला मध्यप्रदेश येथे ताब्यात घेण्यात पणजी पोलिसांना यश आले. तसेच त्याच्याकडून चोरीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात यश मिळाले आहे.
गेल्या १८ फेब्रुवारीला ही चोरीची घटना घडली होती. संशयित विकास या सराफी दुकानात सेल्समन म्हणून कामाला होता. तेथेच त्याने चोरी केली. या प्रकरणी सराफी दुकान मालकाने तक्रार दाखल केल्यानंतर पणजी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. त्यात तो संशयित मध्यप्रदेश येथे मूळ गावी गेल्याची माहिती तपासादरम्यान मिळाली. पणजी पोलिसांनी मध्यप्रदेश पोलिसांशी संपर्क साधून संशयिताची माहिती दिली. त्यानंतर गोवा पोलीस व मध्यप्रदेश पोलिसांनी संयुक्त कारवाईत विकास याला ताब्यात घेतले.