राज्यातील पोलीस खात्यातील ३२ पोलीस उपअधीक्षकांच्या बदल्यांचा आदेश पोलीस मुख्यालयातील पोलीस अधीक्षक एस. एम. प्रभुदेसाई यांनी काल जारी केला. पणजीचे उपअधीक्षक म्हणून सुदेश नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सिद्धांत शिरोडकर यांची पेडणे, जीवबा दळवी यांची म्हापसा, राजेश कुमार यांची वास्को, नीलेश राणे यांची केपे, शिवेंदू भूषण यांची मडगाव, तर संदेश चोडणकर यांची काणकोणच्या पोलीस उपअधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.