रविवारी कोकण रेल्वे मार्गावरील वीर आणि करंजाडी रेल्वे स्थानका दरम्यान मालगाडीचे सात डबे रूळावरून घसरल्याने कोकण रेल्वेची ठप्प झालेली वाहतूक सोमवारी सकाळी ८ वाजता पूर्ववत सुरू झाली. रेल्वे रूळावरून घसरलेले डबे बाजूला काढून वाहतूक पुन्हा सुरू करण्यास २५ तासांचा अवधी लागला. रविवारी सकाळी हे डबे रूळावरून घसरले होते. चतुर्थीचा सण जवळ आलेला असताना हे रेल्वे डबे रूळावरून घसरून वाहतूक बंद पडल्याने कोकण रेल्वे अधिकारी तणावाखाली आले होते.
काल सकाळी ८ वा. वाहतूक पूर्ववत सुरू करण्यास यश आल्यानंतर या अधिकार्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. एकूण २५ तास वाहतूक बंद राहिल्याचे कोकण रेल्वेच्या जनसंपर्क अधिकारी वैशाली पतंगे यांनी सांगितले. या २५ तासांच्या काळात कोकण रेल्वेच्या एकूण चतुर्थीनिमित्त सुरू केलेल्या विशेष डबलडेकर रेल्वे गाड्यांसह एकूण २१ रेलगाड्या रद्द कराव्या लागल्या होत्या. ८ वा. रेल्वे गाड्या पूर्ववत सुरू झालेल्या असता ज्या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्या गाड्यांसाठी आरक्षण केलेल्यांची गैरसोय झाली, असे सूत्रांनी सांगितले.