सुमारे २५० प्रवाशांना नेणारी फेरी बांगलादेशात पद्मा नदीत बुडाल्याचे अधिकार्यांनी सांगितले. काल सकाळी घडलेल्या या घटनेत ४५ प्रवाशांना जीवंत वाचविण्यात यश आले. नदीत पाण्याचा प्रवाह वाढल्यानंतर फेरी अक्षरश: उलटून पडली. फेरीत क्षमतेपेक्षा दुपटीने प्रवासी होते, असे सांगण्यात आले. तीन महिन्यांपूर्वी याच ठिकाणी बोट उलटून ५० प्रवासी मृत्युमुखी पडले होते.