२४ तासांत २.६४ इंच पाऊस

0
120

राज्यात मागील तीन दिवस संततधार कोसळणार्‍या पावसाने काल थोडी उसंत घेतली. मागील चोवीस तासांत २.६४ इंच पावसाची नोंद झाली. दरम्यान, आगामी चार दिवस राज्यातील काही भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
साखळी येथे सर्वाधिक ५.८८ इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यात मागील तीन दिवसांत ६.२५ इंच पावसाची नोंद झाली असून राज्यात आत्तापर्यंत ६२.४४ इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यभरात पावसामुळे झाडांची पडझड झाली असून काही ठिकाणी घरांचे नुकसान झालेले आहे. म्हापसा येथे ३.३१ इंच, पेडणे येथे २.४३ इंच, पणजी येथे २.३५, ओल्ड गोवा येथे २.२५, वाळपई येथे ३.८७, काणकोण येथे १.५५, दाभोळी येथे १.६५, मडगाव येथे १.१६, मुरगाव येथे २.५०, केपे येथे २.८०, सांगे येथे २.४५ इंच पावसाची नोंद झाली आहे.