येथील अमली पदार्थ विरोधी पथकाने (एएनसी) मडगाव रेल्वे स्थानकावर छापा घालून एका विदेशी नागरिकाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून २२.४० लाखांचे अमली पदार्थ रविवारी रात्री जप्त केले.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, आंतोनियो मानुएल फारिया रामोस (४२ वर्षे) असे अटक केलेल्या पोर्तुगीज नागरिकाचे नाव आहे. त्याच्याकडून २४० ग्रॅम चरस, १०१ ग्रॅम एमडीएमए आणि ११० ग्रॅम कोकेन असे अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहेत. एएनसीने नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त केले आहे.