२० लाख टन लोहखनिजाचा २७ ऑगस्ट रोजी ई-लिलाव

0
44

येत्या २७ ऑगस्ट रोजी गोवा सरकार २० लाख टन एवढ्या लोहखनिजाचा ई-लिलाव करणार आहे. सरकारच्या खाण खात्याने २०१५ सालापासून आतापर्यंत २५ वेळा खनिजाचा ई-लिलाव केलेला असून त्याद्वारे सरकारला १३०० कोटी रु. एवढा महसूल प्राप्त झाला आहे. २७ रोजी होणार असलेला ई-लिलाव हा २६ वा लिलाव असेल.

काही खाण कंपन्यांनी बेकायदा ज्या खनिजाचे उत्खनन केलेले आहे त्या खनिजाचा ई-लिलाव करण्याचे काम २०१५ सालापासून चालू आहे.
बेकायदेशीररित्या उत्खनन करण्यात आलेले खनिज हे कुडणे, सोनूस-ओन्वली, पिसुर्ले, वागुस प्लांट, पाळी खाण, कोठंबी जेटी, कुळे व कावरे प्लांटमध्ये पडून आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले. बेकायदेशीरपणे काढलेले खनिज हे विविध जेटींवर तसेच काही खाण पट्ट्यातही पडून आहे. सुमारे १६ दशलक्ष टन एवढे खनिज सरकारच्या ताब्यात होते. त्यापैकी १४ दशलक्ष टनाचा यापूर्वीच बोलीदारांना लिलाव करण्यात आला असून त्याद्वारे राज्य सरकारला १३०० कोटी रु.चा महसूल प्राप्त झालेला आहे.