२० रेल्वेगाड्या रद्द

0
92

मुसळधार पाऊस व दरडी कोसळल्यामुळे २० रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. कोकण रेल्वेच्या १६ तर दक्षिण मध्य रेल्वेच्या ४ गाड्या रद्द केल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. कोकण रेल्वे मार्गात अनेक ठिकाणी पाणी आल्याने कोकण रेल्वेची वाहतूक पूर्णतः बंद ठेवली आहे. आतापर्यंत १६ गाड्या रद्द करण्यात आले आहेत. तर दक्षिण मध्य मार्गात दूधसागरजवळ दरड कोसळल्याने ४ गाड्या रेल्वे रद्द केल्या आहेत. त्यात वास्को निजामुद्दीन गोवा एक्सप्रेस, वास्को यशवंतपूर, वास्को, मुंबई, वास्को, हावडा यांचा समावेश आहे.