एका बांधकाम व्यावसायिकाकडून २० कोटी रुपयांची खंडणी घेताना एका ६२ वर्षीय इसमाला गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाने रंगेहाथ ताब्यात घेतले आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश अगरवाल (रा. दोनापावल) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
संशयित प्रकाश अगरवाल याने एम. एस. माथाईस कन्स्ट्रक्शन कंपनीच्या ताळगाव येथील बांधकाम प्रकल्पाविरुद्ध सरकारी खाती, प्राधिकरणांकडे तक्रार करण्याची धमकी देऊन २० कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. याबाबत गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाला माहिती देण्यात आल्यानंतर माथाईश कंपनीच्या कार्यालयात सापळा रचून २० कोटी रुपयांचा धनादेश स्वीकारताना अगरवाल याला रंगेहाथ पकडण्यात आले.