२०१९ मध्येही मोदीच पंतप्रधान होतील ः नितीश

0
58

विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतरही देशाच्या पंतप्रधानपदी कायम राहतील असा दावा नुकतीच भाजपशी हातमिळवणी केलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केला आहे. राज्यात भाजपशी युती करून सरकार स्थापन केल्यानंतर पहिल्याच पत्रकार परिषदेत कुमार बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी मुकाबला करण्याची क्षमता अन्य कोणत्याच नेत्यामध्ये नसल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. यावेळी त्यांनी राजदचे नेते लालूप्रसाद यादवांसह त्यांचे पुत्र तेजस्वी यादव यांचाही खरपूस समाचार घेतला.
२०१९ नंतरही मोदीच पंतप्रधान होतील काय असा प्रश्‍न विचारला असता कुमार यांनी सांगितले की २०१९ मध्ये पंतप्रधानपदाची खुर्ची मिळवणे अन्य कोणाला शक्य होणार नाही. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर कोणतीही तडजोड करू शकत नाही, असे सांगून त्यांनी लालू प्रसाद यादव यांच्यावर टीका केली.