पूरस्थितीचा फायदा घेत २०० शस्त्रसज्ज दहशतवादी भारतात घुसण्यासाठी नियंत्रण रेषेवर वाट पाहत असल्याची माहिती लष्कराच्या हाती लागली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून लष्कराने सुरक्षा कडक केली आहे. लेफ्ट. जन. सुब्रत सहा यांनी माहिती देताना सांगितले की, पुराचा फायदा उठवत घुसखोरीचे प्रयत्न लष्कराने सातत्याने हाणून पाडले आहे. गेल्या काही खतरनाक दहशतवादी उमर बट याच्यासह ५ दहशतवाद्यांना ठार करण्यात आल्याचे ते म्हणाले.
पुरामुळे लष्कराच्या छावणीचा ५० टक्के भाग पाण्याखाली गेला तरीही लष्कराने चोख सुरक्षा राखली असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, काश्मीर पुरातील मृतांची संख्या २८० बनली आहे.
५० चीनी सैनिक भारतीय हद्दीत
गेल्या दोन दिवसांत दुसर्यांदा ५० चीनी सैनिकांनी लडाखच्या छुमेर भागात भारतीय हद्दीत प्रवेश केला. हे सर्वजण एकुण नऊ वाहनांतून आले होते. चीनी सैनिक भारतीय हद्दीत प्रवेश करून भारतीय लष्करापासून १०० मीटर अंतरावर थांबले. दरम्यान, परवा हद्दीत आलेले चीनी सैनिक माघारी परतले होतेे.