१९ डिसेंबरपूर्वी मडगावात जिल्हा कृषी कार्यालय

0
70

येत्या १९ डिसेंबरपूर्वी मडगाव येथे जिल्हा कृषी कार्यालय व सांगे येथे उप कार्यालय स्थापन करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल विधानसभेत सुभाष फळदेसाई यांच्या प्रश्‍नावर दिले.
सांगे व केपे हे दोन्ही तालुके कृषी उत्पादनात अग्रेसर आहेत. जास्तीत जास्त उत्पादन याच भागातून होते. शेतकर्‍यांचा सबसिडीचे प्रमाण आता दहा कोटींवर पोचले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना प्रत्येक कामासाठी पणजीत यावे लागते. त्यामुळे वरील कार्यालयांसाठी फळदेसाई यांनी मागणी केली होती. वरील कार्यालयांना पूर्ण अधिकार असेल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.