राज्यातील दोन जिल्हा पंचायतींसाठी येत्या १८ रोजी ५० मतदारसंघांमध्ये मतदान होणार असल्याने राज्य सरकारने या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.राज्यातील औद्योगिक कर्मचार्यांसाठी या दिवशी भर पगारी सुट्टी असेल असे माहिती खात्याच्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे तसेच राज्यातील सर्व खाजगी आस्थापनांच्या कर्मचार्यांनाही या दिवशी भर पगारी सुट्टी असेल असे या पत्रकात नमूद केले आहे.