गोव्यातील विविध जेटींवर असलेल्या खनिज मालाचा पाचव्या टप्प्यातील ई-लिलाव येत्या १५ दिवसांनंतर करण्यात येणार असल्याचे खाण खात्याचे उपसंचालक पराग नगर्सेकर यांनी सांगितले. पाचव्या टप्प्यातप १५ लाख टन एवढ्या खनिजाचा ई-लिलाव करण्यात येणार असून त्याद्वारे सुमारे १०० कोटी रु. मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यापूर्वी खाण खात्याने विविध जेटींवर असलेल्या खनिज मालाचा जो लिलाव केला होता त्याद्वारे सरकारला ५५० कोटी रु. एवढा महसूल प्राप्त झालेला आहे. दरम्यान, सध्या खनिजाचे दर अत्यंत खाली आलेले असल्याचे खाण खात्याने पाचव्या टप्प्यातील ई-लिलाव केला नव्हता. मात्र, आता येत्या १५ दिवसानंतर हा लिलाव होण्याचे संकेत नगर्सेकर यांनी दिले.