१२ ते १४ वयोगटातील मुलांचे लसीकरण मार्चमध्ये

0
10

देशात मुलांच्या लसीकरणालाही सुरुवात झाली असून, १५ वर्षांवरील मुलांना लस देण्यात येत आहे. त्यानंतर आता देशात मार्च महिन्यापासून १२ ते १४ वयोगटातील मुलांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे.
कोरोना लसीकरणावरील एनटीजीआय गटाचे प्रमुख एन. के. अरोरा यांनी ही माहिती दिली. एनटीजीआयने जानेवारीअखेरपर्यंत १५ ते १८ वयोगटातील सर्व ७.४ कोटी मुलांना लसीचा पहिला डोस देण्याचा अंदाज वर्तवला आहे. फेब्रुवारीत या मुलांना लसीचा दुसरा डोस दिला जाऊ शकतो. त्यानंतर मार्चच्या सुरुवातीला १२ ते १४ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू करण्यात येईल.