राणेंचा राष्ट्रवादीला इशारा
शिवसेना-भाजप यांच्यात विधानसभा जागा वाटपाबाबत संघर्ष चालू असतानाच कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्या युतीबाबतही तसाच प्रकार सुरू आहे. कॉंग्रेसचे प्रचार समिती प्रमुख नारायण राणे यांनी काल राष्ट्रवादीने १२४ जागांवर समाधान मानावे, अन्यथा २८८ जागा एकट्याने लढविण्याची कॉंग्रेसची सज्जता असल्याचा इशारा दिला कॉंग्रेस आज किंवा उद्या पहिली उमेदवारी यादी जाहीर करेल असेही त्यांनी स्पष्ट केले. येथे आयोजित पत्रकार परिषदेत राणे यांनी शिवसेना-भाजप युतीवरही टिप्पणी केली. त्यांच्यातील युती राहो किंवा तुटो आम्ही दोन हात करण्यास तयार आहोत असे ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीतील मोदी लाट ओसरत चालली असून या विधानसभा निवडणुकीत ही लाट चालणार नाही असा दावा त्यांनी केला