११ लाखांचे विदेशी चलन दाबोळीवर जप्त

0
91

दाबोळी विमानतळावर केलेल्या कारवाईत कस्टम विभागाकडून दोन विमान प्रवाशांकडून ११ लाखांचे विदेशी चलन जप्त करण्यात आले.
कस्टम विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार कस्टम विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार त्यांनी बंगळूर-गोवा मार्गे दुबईला जाणार्‍या एअर इंडिया विमानातून सदर प्रवासी प्रवास करीत होते.

काल संध्याकाळी सदर एअर इंडिया विमान दाबोळी विमानतळावर उतरताच पाळत ठेऊन असलेल्या कस्टम अधिकार्‍यांनी सदर विमानातील प्रवाशांची तसेच त्यांच्या सामानांची झडती घेतली असता दोन केरळीयन प्रवाशांच्या बॅगेत विदेशी चलन (साऊदी रियाद) सापडले. त्यांची भारतीय चलनानुसार ११ लाख ४० हजार रुपये एवढी किंमत होत आहे. सदर प्रवाशांना कस्टम अधिकार्‍यांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सदर विदेशी चलन जप्त करण्यात आले.
सदर कारवाई कस्टम आयुक्त आर. मनोहर यांच्या मार्गदर्शनाखाली टी. एन. गजलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त कस्टम विभाग यांनी केली. पुढील तपास चालू असल्याचे यावेळी सांगण्यात आले.