गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील १०८ रुग्णवाहिका सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी १०८ च्या कर्मचार्यांनी कालपासून येथील आझाद मैदानावर साखळी उपोषण सुरू केले आहे. बाहेरील कर्मचार्यांस सेवेत घेऊन सुरुवातीपासून सेवेत असलेल्या कर्मचार्यांना काढून टाकल्याने गेल्या बर्याच दिवसांपासून त्यांचे आंदोलन सुरू आहे.