होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी भावेश भिंडेला अटक

0
26

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी संशयित भावेश भिंडेला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्याला उदयपूरमधून ताब्यात घेण्यात आले असून, लवकरच मुंबई आणण्यात येणार असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली. मुंबईत 13 मे अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे घाटकोपरच्या पूर्व द्रुतगती मार्गावर लावलेले होर्डिंग कोसळले होते. या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला होता. हे होर्डिंग ज्या इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने लावले होते, त्या कंपनीचा संचालक भावेश भिंडे असल्याने त्याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.