दक्षिण कोरियाविरुद्ध पुढील महिन्यात होणार्या हॉकी स्पर्धेसाठी भारताच्या २० सदस्यीय महिला संघाचे नेतृत्व अनुभवी आघाडीपटू राणी रामपाल हिच्याकडे सोपविण्यात आले आहे. तंदुरुस्त झालेली आघाडीपटू पूनम राणीचे संघात पुनरागमन झाले आहे. ३ ते १२ मार्च या कालावधीत जिनचुन राष्ट्रीय ऍथलेटिक केंद्रावर भारतीय संघ कोरियाविरुद्ध खेळणार आहे. बचावपटू सुनीला लाक्रा हिच्याकडे उपकर्णधारपद देण्यात आले आहे. नियमित गोलरक्षक सविता हिला विश्रांती देण्यात आली आहे. रजनी इटिमारपू व पदार्पणवीर स्वाती यांच्यावर गोलरक्षणाची जबाबदारी असेल.
गोलरक्षक ः रजनी इटिमारपू, स्वाती, बचावपटूः दीपिका, सुनीता लाक्रा, दीप ग्रेस इक्का, सुमन देवी थुडाम, गुरजीत कौर, सुशील चानू पुखरामबाम, मध्यरक्षक ः मोनिका, नमिता टोप्पो, निक्की प्रधान, नेहा गोयल, लिलिमा मिन्झ व उदिया, आघाडीपटू ः राणी, वंदना कटारिया, लालरेमसियामी, नवज्योत कौर, नवनीत कौर व पूनम राणी.