येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय हॉकी संघाचा धडाका सुरूच आहे. काल भारताच्या पुरुष हॉकी संघाने हॉंगकॉंगवर २६-० अशा गोलफरकाने धुव्वा उडवित ८४ वर्षानंतर आतापर्यंतच्या आपल्या हॉकी इतिहासातील सर्वांत मोठ्या आंतरराष्ट्रीय विजयाची नोेंद केली.
भारतीय हॉकी संघाने यापूर्वी १९३२ साली ऑल्मिपकमध्ये अमेरिकेवर २४-१ अशी मात केली होती. तो भारताचा आतापर्यंतचा सर्वांत मोठा विजय होता. जो भारतीय संघाने काल मोडित काढला. या विजयाबरोबरच भारतीय संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेतील आपल्या १७-० गोलचा विक्रमही मोडित काढला. याच स्पर्धेतील आपल्या पहिल्या सामन्यात भारताने यजमान इंडोनेशियाचा १७-० असा पराभव करीत आशियाई स्पर्धेतील आपल्या सर्वांत मोठ्या विजयाची नोंेद केली होती. परंतु भारताला आंतरराष्ट्रीय हॉकी इतिहासातील सर्वांत जास्त गोलांचा विक्रम मात्र मोडता आला नाही. जो न्यूझीलँडने १९९४साली सामोआला ३६-१ असे पराभूत करीत नोंदविला होता.
कालच्या हॉंगकॉंगवरील २६-० अशा विजयात भारताच्या चार खेळाडूंनी हॅट्ट्रिक नोंदविल्या. भारतीय खेळाडूंनी आपला दर्जेदार खेळ करताना संपूर्ण सामन्यावर वर्चस्व राखले होते. हॉंगकॉंगच्या खेळाडूंना एकदाही भारतीय बचावफळी व गोलरक्षकाला भेदता आले नाही.
भारतातर्फे चार खेळाडूंनी आपली हॅट्ट्रिक साधली. रुपिंदरपाल सिंगने (३रे, ५वे, ३०वे, ४५वे, ६०वे मिनिटे) सर्वाधिक पाच गोल नोंदविले. हरमनप्रीत सिंगने (२९वे, ५२वे, ५३वे, ५५वे) चार गोल, आकाशदीप सिंग (२रे, ३२वे, ३५वे मिनिट) यांनही हॅट्ट्रिक नोंदविल्या. मनप्रीत सिंग (३रे व १७वे मिनिट), ललित उपाध्याय (१७वे व १९वे मिनिट), वरुण कुमार (२३वे व ३०वे मिनिट) यांनी दोन तर एसव्ही सुनिल (७वे मिनिट), विवेक सागर प्रसाद (१४वे मिनिट), मंदीप सिंग (२१वे मिनिट), अमित रोहिदास (२७वे मिनिट), दिलप्रीत सिंग (४८वे मिनिट), चिंगलेसानास सिंह कांगुजाम (५१वे मिनिट), सिमरनजीत सिंग (५३वे मिनिट) आणि सुरेंदर कुमार (५५वे मिनिट) यांनी प्रत्येकी १ गोल नांेंदविला. आतापर्यंत भारतीय संघाने या स्पर्धेत एकूण ४३