हैदराबाद महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने जोरदार मुसंडी मारत तब्बल ४६ जागा जिंकल्या आहेत. मागील निवडणुकीत भाजपच्या फक्त ४ जागा होत्या. हैदराबाद महापालिका निवडणुकीत सत्तारूढ टीआरएसच्या खात्यात ५६ तर ओवेसी यांच्या एआयएमआयएम पक्षाला ४३ जागा मिळाल्या आहेत. भारतीय जनता पक्षाच्या या दमदार कामगिरीमुळे विरोधी पक्षांची चिंता वाढली आहे.
असदुद्दीन ओवेसी यांच्या बालेकिल्ला सर करण्यासाठी पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाने मोठ्या निवडणुकीप्रमाणे आपली सर्व शक्ती पणाला लावली होती. या निवडणुकीच्या प्रचारासासाठी अमित शहांपासून ते जेपी नड्डा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांपर्यंत अनेक नेत्यांनी हैदाबादमध्ये पक्षाचा प्रचार केला आहे.
हैदराबादमध्ये विधानसभेच्या २४ जागा आहेत. तर लोकसभेच्या एकूण ५ जागा आहेत. सध्या तेलंगणच्या ११९ विधानसभेच्या जागांपैकी भाजपकडे फक्त २ जागा आहेत. तर लोकसभेच्या एकूण १७ जगांपैकी भाजपकडे ४ खासदार आहेत.