
पणजी (क्री. प्र.)
गोवा क्रिकेट संघटनेने २१ ते २३ ऑक्टोबरपर्यंत जीसीएच्या पर्वरी येथील मैदानावर होणार्या हैदराबादविरुद्धच्या तीन दिवशीय लढतीसाठी गोव्याच्या १६ वर्षीय क्रिकेट संघाची घोषणा केली असून संघाचे नेतृत्व मनिष काकोडेकडे सोपविण्यात आले आहे.
घोषित संघ पुढील प्रमाणे
मनिष काकोडे (कर्णधार), शोएब शेख, ईझान शेख, दीप कासवणकर, कौशल हट्टंगडी, देवेन कुमार चित्तम, लकमेश पावणे, सुजय नाईक, सुयेश पागी, जय पटेल, सय्यद जुनैद अहमद (यष्टिरक्षक), आर्यन माशेलकर, झिशान खान, वीर यादव, प्रज्ञेश गावकर, मनिष कुमार निशाद.