हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी सुरू

0
102

कालपासून राज्यातील सर्व महामार्गांवरून प्रवास करणार्‍या दुचाकीस्वारांना व मागे बसलेल्या प्रवाशांनाही हेल्मेट सक्ती निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाल्याने वाहतूक पोलीस हेल्मेट नसलेल्या प्रवाशांना चलने देण्याचे काम जोरात करीत होते. मागे बसणार्‍या प्रवाशांनाही हेल्मेट वापरावे लागल्याने अनेकजण अडचणीत आले.
मागे बसलेल्या प्रवाशांना हेल्मेट सक्ती केल्याने राज्यातील मोटरसायकल पायलट व्यवसायिकांसमोर गंभीर समस्या निर्माण झाली आहे. हेल्मेट सक्ती केली तरी पायलटांच्या प्रश्‍नावर सरकारने अद्याप ठोस असा कोणताही तोडगा काढलेला नाही. गोवा वगळता अन्य कोणत्याही राज्यात हा व्यवसाय नाही. त्यामुळे तेथे ही समस्या नाही. हेल्मेट सक्तीमुळे गेले चार दिवस हेल्मेटच्या दुकांनावर गर्दी होती. आयएसआय मार्क असलेली हेल्मेट मिळणे कठीण झाले आहे. गांधी जयंतीच्या सुटीमुळे रस्त्यावर काल वाहनांची वर्दळ कमी होती, असे असले तरी दुचाकीवर मागे बसलेल्यांनी हेल्मेटचा वापर केल्याचे दिसले नाही.