तामिळनाडूतील हेलिकॉप्टर दुर्घटनेतून बचावलेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांचे काल अखेर निधन झाले. दुर्घटनेत जखमी झाल्यानंतर त्यांच्यावर बंगळुरु येथील कमांड रुग्णालयात उपचार सुरु होते. दुर्घटनेत संरक्षण दलांचे प्रमुख (सीडीएस) जनरल बिपिन रावत यांच्यासह इतर १३ जणांचा बुधवारी मृत्यू झाला होता. यावेळी फक्त वरुण सिंग दुर्घटनेतून बचावले होते. मात्र दुर्दैवाने उपचारादरम्यान बधुवारी त्यांचे निधन झाले.
या दुर्घटनेत वरुण सिंग गंभीर जखमी झाले होते. ते जवळपास ४५ टक्के भाजले होते. त्यांच्यावर लष्करी रुग्णालयात उपचार सुरू होते. ज्या डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज, वेलिंग्टन येथे सीडीएस बिपिन रावत व्याख्यानासाठी गेले होते, त्याच सुलूर हवाई तळावर वरुण सिंग विंग कमांडर होते.