मनोहर पर्रीकर संरक्षणमंत्री असताना गोव्यात हेलिकॉप्टर दुरुस्ती, देखभाल व तपासणी करणारा जो १७० कोटी रुपये गुंतवणुकीचा प्रकल्प उभारण्याचे ठरले होते तो प्रस्तावित प्रकल्प पुढे नेण्याची योजना आखण्यात आले असल्याचे संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी काल जाहीर केले. नाईक यांच्या कार्यालयातून काल प्रस्तृत करण्यात आलेल्या पत्रकातून ही माहिती देण्यात आली.
२०१६ साली या प्रकल्पाची घोषणा करण्यात आली होती. मात्र प्रकल्पाचे काम सुरू होऊ शकले नव्हते. मनोहर पर्रीकर यांनी ऑक्टोबर २०१६ मध्ये प्रकल्पाची घोषणा केली होती. प्रकल्पासाठी जमीन संपादनही झाले होते. सत्तरी तालुक्यातील होंडा गावात हा प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव आहे.
हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड बेंगळुरू आणि फ्रेंच कंपनी सफ्रान हेलिकॉप्टर इंजिन यांनी हेलिकॉप्टर इंजिन एआरओ प्रा. लिमिटेड यांनी संयुक्तरित्या हेलिकॉप्टर दुरुस्ती प्रकल्प गोव्यात उभारण्याचे ठरले होते. मात्र त्याचे काम सुरू होऊ शकले नव्हते.