हेमंत सोरेन पुन्हा मुख्यमंत्रिपदी विराजमान

0
8

हेमंत सोरेन हे पुन्हा एकदा झारखंडच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. तुरुंगातून सुटल्यानंतर सहाव्या दिवशी त्यांनी पुन्हा एकदा राज्याची सूत्रे हाती घेतली ते झारखंडचे 13 वे मुख्यमंत्री बनले. राजभवन येथे झालेल्या शपथविधी समारंभात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी हेमंत सोरेन यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. त्यांच्यासोबत कोणत्याही कॅबिनेट मंत्र्याने शपथ घेतली नाही. यासह ते तिसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे तिसरे मुख्यमंत्री ठरले आहेत. त्यांच्या आधी त्यांचे वडील शिबू सोरेन आणि भाजप नेते अर्जुन मुंडा यांनी तीन वेळा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.