आंध्रच्या किनारपट्टीला थडकलेल्या हुडहुड वादळात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २१ झाली आहे. पैकी १५ जण विशाखापट्टनम येथे, ५ विझिनगरम येथे तर एकजण श्रीकाकुलम येथे मृत्यू पावल्याचे राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीकडून सांगण्यात आले. बहुतेक मृत्यू अंगावर वृक्ष कोसळून पडल्याने झाले. २०० कि.मी./तास वेगाच्या वादळात आंध्र किनारपट्टीची संपूर्ण वाताहात झाली आहे. यात सर्वात जास्त हानी विशाखापट्टनमची झाली आहे.