भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गोवा मुक्तीच्या ६०व्या महोत्सवाला एक दिवसासाठी हजर राहणार आहेत मात्र, पंतप्रधानांच्या ह्या एका दिवसाच्या दौर्याच्या तपशीलवार कार्यक्रमाची रुपरेषा येणे बाकी आहे. असे काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी संगितले. मोदी यांच्या गोवा भेटीचा कार्यक्रमासंबंधी सावंत म्हणाले की, ते प्रथम सकाळी आझाद मैदानावरील हुतात्मा स्मारकावर पुष्पांजली वाहतील, तसेच ते भूदल, नौदल व हवाईदल यांच्याकडून मानवंदना स्वीकारतील.
नंतर दुपारी ३.३० ते ५.३० ह्या दरम्यान बांबोळी येथील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम येथे पंतप्रधानांचा जाहीर कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमात ते अनेक योजनांचा शुभारंभ करणार आहेत. असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.